Nilesh Mundhe
देव मोठा की गुरू ?
एका शिष्याने त्यांना प्रश्न केला ," स्वामीजी , देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ ?"
ते म्हणाले," गुरू श्रेष्ठ !!! कसे म्हणताय ???
असं समजा एका वाळवंटातून एक वाटसरू चाललाय ... उन आग ओकतय... प्रचंड तहान लागली आहे... जवळचं पाणी कधीच संपलय !! आता थरथर सुरू झालीय शरीरात !!! पाय कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे !!!..... आणि अचानक त्याला समोर एक विहीर दिसते !! बाजूला थोडी हिरवळ पण आहे !!! म्हणजे नक्की तिथे पाणी आहे !! .....
तो बळ एकवटून पाय उचलतो, पण ... दोन पावलांवरच तो कोसळतो !!! ताकदच संपते पायातली .... !!
पाणी तर समोरच दिसतंय पण पाण्यापर्यंत पोचता येत नाहीये !!!
अशावेळी एक व्यक्ती तिथे येते !!! विहीरीतून पाणी शेंदते, लोटाभर पाणी घेऊन येते आणि त्या व्यक्तीला पाजते !!! त्याचा जीव वाचतो !!!...
आता प्रश्न असा आहे की त्या पांथस्थाचा जीव कोणी वाचवला ? पाण्याने की पाणी पाजणा-या व्यक्तीने ?
तर उत्तर फार अवघड नाहीये !!! ती व्यक्ती महत्वाची !!! पाणी तर होतेच ना विहीरीत !!
तसेच ; परमात्मा आपल्या जवळंच आहे हो, पण आपणंच दूर आहोत त्याच्यापासून !!!
षड्रिपूंच्या वाळवंटातून चालताना पार थकून जातो आपला जीव !! अशावेळी मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घेऊन जो मदत करतो , भगवंतापर्यंत घेऊन जातो ,तो गुरूच श्रेष्ठ !!!"
🙏 रामकृष्णहरि 🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा