Nilesh Mundhe
आजकाल *देवांची* व *देवस्थानांची* अवस्था सुद्धा *डॉक्टरांसारखीच* झालीय,
म्हणजे *गावातला देव* किंवा *मंदीर* म्हणजे *BHMS* किंवा *BAMS* डॉक्टर.
किरकोळ सर्दी, पडसं, थंडीताप, छोटे मोठ्या तक्रारी अडचणी असतील तर या डॉक्टर कडे जायचे.
जरा *मध्यम आजार* असेल तर *अष्टविनायक,* *गणपती पुळे,* *पावस,* *चाफळ* वगैरे ठिकाणी गेलं म्हणजे कसं *MBBS* वाल्याकडं गेल्यासारख वाटतं.
जरा *कडक आजार* असेल तर *मांढरदेवी,* *जेजूरी,* *पाली,* *शनी शिंगणापुर* असे जरा *प्रयोगशील डॉक्टरर्स,* डिग्री मोठी नसताना पण धाडसानं प्रँक्टीस करणाऱ्या डॉक्टरां सारखेच.
*शिर्डी,* *सिद्धीविनायक,*
*दगडूशेठ,* *लालबाग,* *हाजी अली* म्हणजे *MS,* *MD.* थोडा खर्च जादा पण *स्पेशालिस्टकडे* गेल्यासारखा अनुभव येतो.
*तिरूपती,* *अमरनाथ,* *वैष्णवीदेवी,* *अजमेर शरीफ* म्हणजे *फॉरेन रिटर्न डॉक्टरच!* हे शक्यतो पैसेेवाल्यांचे डॉक्टर. पैसा कितीही गेला तरी चालेल पण गुण एकदम झकास आला पाहिजे. सगळे आजार बिजार एकदम गायबच झाले पाहिजेत. इथे सामान्य पेशंटना सहजासहजी प्रवेश नाही.
आणि एकीकडे
*पंढरीचा पांडूरंग* म्हणजे आपला *सरकारी डॉक्टर,*
कमी पैशात सगळ्या गोरगरीबांची दुखणी बरी करणार. कधीही जावा, कधीही उठवा, रागावणार नाही का आधी पैसे भरा मगच उपचार सुरू करू असली भानगड नाही. पैसे द्या अथवा देवू नका, दारात येईल त्याच्यावर औषधोपचार करणार.
🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा