Nilesh Mundhe

*💁 बायको जर नसेल तर*
*राजवाडा पण सुना आहे*
*बायकोला नावं ठेवणे हा 🙅*
*खरंच गंभीर गुन्हा आहे ! 🙅*

*💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय*
*🍃 पानही हालत नाही...*
*घरातलं कोणतंच सुख*
*बायको शिवाय फुलत नाही !💃*

*💁 नोकरी अन पगाराशिवाय*
*नवऱ्याजवळ आहे काय?🙆*
*तुलनाच जर केली तर*
*सांगा, तुम्हाला येतं काय?🙇*

*💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡*
*बायकोमुळेच असतं...*
*नवरा नावाचं विचित्र माणूस*
*तिलाच हसत बसतं !*

*वय कमी असून सुद्धा*
*बायको समजदार असते..👩👱*
*बायकोपेक्षा नवऱ्याचे वय👴👨*
*म्हणूनच जास्त असते !*

*💁तिचा दोष काय तर म्हणे*
*चांगल्या सवयी लावते !*
*कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃*
*दिवस रात्र धावते !*

*🙅 चिडत असेल अधून मधून*
*सहनशीलता संपल्यावर;*
*तुम्हीच सांगा काय होणार*
*चोवीस तास जुंपल्यावर ?*

*बायकोची टिंगल करून*
*फिदी फिदी हसू नका..😁*
*तिच्या यादीत मूर्ख स्थानी*
*नंबर एक वर बसू नका...🙇*

*💁बायको म्हणजे अंगणातला*
*प्राजक्ताचा सडा !🌸🌼🌺*
*बायको म्हणजे पवित्र असा*
*अमृताचा घडा !⚱*

*बायको म्हणजे सप्तरंगी🌈*
*इंद्रधनुष्य घरातलं !*
*भगवंतासाठी गायलेलं*
*भजन गोड स्वरातलं !🎶*

*🙎नवरोजी 💁बायकोकडे*
*माणूस म्हणून पहा..*
*तिचं मन जपण्यासाठी*
*थोडं शांत रहा..😷🙅‍*

*कधीतरी कौतुकाचे*
*दोन शब्द बोलावे🙋*
*तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी*
*आनंदाने झेलावे !🙆*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

рдЯिрдк्рдкрдг्рдпा

рдпा рдм्рд▓ॉрдЧрд╡рд░ीрд▓ рд▓ोрдХрдк्рд░िрдп рдкोрд╕्рдЯ

рд╕ंрдХ्рд░ांрддीрдЪी рдоाрд╣िрддी-реирежрезреп