एका लाडक्या मुलीसाठी
मुलगी जेंव्हा लग्न करून सासरी जात असते तेंव्हा ती जास्त परकी नाही वाटत,,
पण जेंव्हा काही दिवासांनी माहेरी येते आणि तोंड हातपाय धुतल्यावर घरातला टॉवेल न घेता स्वतःच्या बॅगेतून छोटा रुमाल काढून तोंड पुसते ,,
तेंव्हा ती जास्त परकी वाटते ..
जेंव्हा ती किचन च्या दारातूनच पाण्याचा ग्लास ठेवायला जागा शोधते तेंव्हा ती जास्त परकी वाटते....
जेंव्हा ती विचारते फॅन लावू का ?
तेंव्हा ती जास्त परकी वाटते....
जेंव्हा जेवायला बासल्यावर ती पातेल्याचे झाकणही उघडून पाहत नाही
तेंव्हा ती जास्त परकी वाटते....
जेंव्हा पैशे मोजताना ती मुद्दाम नजर दुसरीकडे फिरवून घेते ,,,
तेंव्हा ती जास्त परकी वाटते....
परत सासरी जाताना तिला जेंव्हा विचारतात "आता कधी येशील ?" तेंव्हा उत्तर देते " बघीन ,, आता काय माहित कधी येणं होत ते,,""
तेंव्हा ती जास्त परकी वाटते....
जेंव्हा गाडीत बसते आणि खिडकीकडे तोंड करून पाणावलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न करते ,,,,
तेंव्हा मात्र सगळं परकेपणा नाहीसा होतो ...
हा मायेचा खजिना त्याच्याच नशिबात असतो ,, जो मुलगी झाल्याने दुखी न होता आनंदाने गर्वाने फुलून जातो ...
मुलगी ओझे नसून आयुष्यातली हिरवळ आहे..तिला फुलू द्या ,, तिला बहरू द्या ,,,,,तिला शिकू द्या...
एका लाडक्या मुलीसाठी
🙏🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा