संक्रांतीची माहिती-२०१९

Ilश्री:ll

संक्रांतीची माहिती-

वाहन - सिंह
उपवाहन - हत्ती
वस्त्र - पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे , म्हणून पांढरे वस्त्र घालायचे नाही.
शस्त्र - भृशुंडी
वयाने बाल आहे.
वासा करिता चाफ्याचे फुल घेतले आहे.
अन्न भक्षण करित आहे.
प्रवाळ रत्न धारण केले आहे.
दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे, ईशान्य दिशेस पहात आहे, म्हणून पूर्व पश्चिम वाणववसा करणे.
मुहूर्त - सूर्योदयापासून सुर्यास्ता पर्यंत आहे. ...
गाईला घास अन्ना तील पात्र गुळ  भूमी घोडा इत्यादी यथाशक्तीप्रमाणे दान करावे ....
*मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा*


* मकर संक्रांतीचे दान*

1. *गहू आणि हरभरा डाळ *
दोन्ही शक्ती आणि धैर्य दर्शविणारे आहेत. गहू आणि हरभरा डाळ दान केल्याने घरात स्थिरता येते. गहू हे सूर्यशी संबंधित अन्न आहे आणि हरबरा भगवान गुरू शी संबंधित आहे. संक्रांती  दिवशी  दान केलेमुळे जमीन संबधित लाभ आणि मुलान बाबतीत लाभ होतात.
व्यवसायात आणि नोकरीमध्ये स्थिरता येते.
मंत्रः ओम सूर्योय नमः

2. *जव आणि तीळ *
दोन्ही अन्न आनंदी जीवनाचे सूचक आहेत.
जव शुक्रशी संबंधित आहे आणि तीळ शनिशी संबंधित आहे. या दोन अन्नांद्वारे दानामुळे घरात आनंद मिळतो, कठोर परिश्रम पूर्ण होते. घरात कशाची कमतरता राहत नाही
मंत्रः ओम मार्तंडणय नमः

3. * तांदूळ आणि मूग  *
दोन्ही धान्ये योग्य मार्ग आणि नातेसंबंधांचे सूचक आहेत, पैशाचे सूचक आहेत.
तांदूळ चंद्र आणि मूग बुधेशी संबंधित आहे. या दानापासून  चांगले मार्ग विसरत नाहीत, ते नेहमी योग्य दिशेने राहतात. चुकीचे लोक आणि चुकीचे कार्य हातून घडत नाहीत
मंत्र: ओम मित्राय नमः

दान देताना मंत्र किमान 108 वेळा म्हणणे.


*श्री मकर संक्रांतीचे महत्व व पूजाची माहिती*

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रीयाचा अतिशय   महत्त्वाचा सण आहेत , यावर्षी  दिनांक १४ ला भोगी, १५ ला मकर संक्रांत, १६ ला किंक्रांत हे मंगलमय सण हा तीन दिवस साजरा करण्यात येणार आहे

*संक्रांतीचे महत्त्व व पुराणात उल्लेख:-*

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, हा काळ अत्यंत पुण्यकाळ असतो.

या तीन दिवसी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतात हा सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

*मकर संक्रांतीचे महत्व, माहिती व सौभाग्यवतीनी ही पूजा कशी करावी:-*

जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते.

*भोगी:-*

*दि. १४/०१/२०१९ रोजी सोमवार*

पौष शु पक्ष अष्टमी ह्या दिवशी भोगी हा सण आहे.
ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी अजुन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

*श्री सुर्य संक्रमण:-*

शके १९४० पौष शु ८ ला रोज रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे

*मकर संक्रांत:-*

मकर संक्रांती माहिती

प्रती वर्षाप्रमाणे या वर्षीची मकर संक्रात शके १९४० पौष शु ८ ला रोज रविवार दिनांक १४/०१/२०१९ रात्री ०७:५१ मिनीटांनी श्रीसुर्य मकर राशीत प्रवेश करत आहे

पर्वकाळ पौष शु ९ ला दिनांक १५/०१/२०१९ मंगळवार सकाळी सुर्यदय ०७:१४ मी पासुन ते सुर्यास्त संध्याकाळी ०६:२० मी पर्यत आहे

*संक्रांती फल:-*

संक्रात वाहन सिंह उपवाहन हत्ती आहे.
पांढरे रंगाचे वस्ञ परिधान केले आहे.हातात भृशुंडी शस्त्र
घेतलेले आहे. कपाळावर कस्तुरीचा टिळा लावला आहे वयाने बाल आहे. वासाकरिता चाफ्याचे फुले घेतल आहे. देव जाति आहे. अन्न भक्षण करते आहे.
भुषणार्थ प्रवाळ रत्ने धारण केले आहे 
वारनांव व नक्षञनांव ध्वाक्षी आहे. प्रवास दक्षिणे कडून
उत्तरेस जात आहे  ईशान्य दिशेस पाहत आहे.

*पुजा साहित्य:-*
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), २ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.

पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.

मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी किक्रांत असते. त्यादिवशी कोणतेही शुभ म्हणजे चांगले कोणते ही काम करू नये.

किंक्रांत:-

*दि १६/० १/२०१९ रोजी बुधवार*

पौष कृष्ण दशमी हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी अजुन किंक्रांत संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.

*यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे*

इ स १९७२ सालापासून सन २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून मकर संक्रांत १६ जानेवारीला येईल. तर ३२४६ मध्ये मकर संक्रांत चक्क १ फेब्रुवारीला साजरी केली जाईल, अशी रंजक माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासकाची यांची आहे.

त्यामुळे मकर संक्राती पुण्यकाळ यावेळी १५ जानेवारी रोजी आली असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येते  हे खरे नाही. सुर्‍याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा तो मकर राशीत प्रवेश करेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास, नऊ मिनिटे व दहा सेकंद एवढा कालावधी लागतो. ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल तर त्या  वर्षी `लीप वर्ष’ धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर १५७ वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो, अशी माहिती सोमण यांनी दिली.

सन १८९९ मध्ये निरयन मकर संक्रांती १३ जानेवारीला आली होती. सन १९७१ पासून सन निरयन मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती.  १९७२ पासून सन २०८५ पर्यंत निरयन मकर संक्रांती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येईल. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे सरकत सरकत ३२४७ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले आहे.

मकर संक्रांती ही वाईट नसते. `संक्रांत आली’ हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थ वापरत असतो. दिनमान वाढत जाणे,  त्याच दिवशी, शिशिर ऋतुचा प्रारंभ झाला. मकर राशीला तीळगुळ देण्याची प्रथा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. मकर संक्रांतीच्या  वेळी काही अफवा पसरवितात त्यावर विश्वास ठवू नका तसेच अफवा पसरवू नका असे आवाहनही मी करतो ही विनंती आहे

हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.

*संक्रांतीच्या दिवशी दान व महत्व:-*

या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.

*संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।*
*तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।*

( मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो) आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदुळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, दव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

शास्त्रानुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनूसार काही उपाय करावेत. या उत्तरायणात राशीनूसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्ही मालामाल व्हाल.

मेष -
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदानीचे दान करावे.

*वृषभ -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे व तिळाचे दान करावे.

मिथुन -
या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कापड, तीळ, मच्छरदानीचे दान करावे.

कर्क -
या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी शाबूदाणा आणि लोकरीचे वस्त्र दान करावे.

सिंह -
या राशीच स्वामी सूर्य आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माणिक, गहू, लाल कापड, लाल फूल , गुळ , सोने, तांबे, चंदन दान करावे.

*कन्या -*
या राशीचा स्वामी बुध आहे, राशीच्या स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद, तिळाचे दान करावे.

तूळ -
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत.

*वृश्चिक -*
या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना तांदूळ , खिचडी, धान्य दान करावे.

*धनु -*
या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभ-याची डाळ दान केल्यास विशेष लाभ प्राप्त होईल.

*मकर -*
या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांना तिळ, तेल, काळी गाय, काळे वस्त्र यांचे दान करावे.

कुंभ -
ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे. त्यामुळे या राशीच्या तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे.

*मीन -*
शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र यांचे दान करावे.

नोट :- दर वर्षा मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगल्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकाराच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय कधीच नसतो. त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

*मकरसंक्रांत*

मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व, या दिवशी करायचे धार्मिक विधी याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.

१. तिथी
हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो.

२. इतिहास
संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

३. संक्रांतीविषयी पंचांगात असलेली माहिती
पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा इत्यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते. संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्याचा नाश होतो.

४. महत्त्व
या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्याचे उत्तरायण चालू होते. कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनात मरण आलेली व्यक्ती उत्तरायणात मरण आलेल्या व्यक्तीपेक्षा दक्षिण लोकात (यमलोकात) जाण्याची शक्यता जास्त असते.

अ. साधनेच्या दृष्टीने महत्त्व
या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणार्‍याला या चैतन्याचा लाभ होतो.

५. सण साजरा करण्याची पद्धत
अ. मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे
‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.’

आ. दान

१. ‘पर्वकाळी दानाचे महत्त्व
दान देणे
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

मकरसंक्रांतीच्या पर्वकाळी दानाचे महत्त्व

२. दानाच्या वस्तू
‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.

 मकरसंक्रांतीच्या पर्वकाळी कुठल्या वस्तुंचे दान देणे योग्य ?

३. वाण देण्याचे महत्त्व
‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.
मकरसंक्रांतीला अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण देणे

४. वाण कोणते द्यावे ?
असात्त्विक वाण देण्यामुळे होणारी हानी :प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो.
सात्त्विक वाण देण्याचे लाभ : सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.
सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयकध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

इ. सुगड
‘संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.’

र्इ. बोरन्हाण
मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला काळे झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.
प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदीकुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

६. निषेध
अ. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे आणि लैंगिक भावना उद्दीपीत होणार्‍या कृती करणे टाळावे.
आ. पतंग उडवू नका ! : सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाईल आणि साधना अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.’

टिप्पण्या