फक्त आई

-----------------------------------------------
*जाणून घेऊया की मदर्स डे साजरा करण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली व लोक हा दिवस आईसाठी का समर्पित करतात.*
------------------------------------------------
*अमेरिकेत*
सर्वप्रथम मदर डे प्रोक्लॉमेशन जुलिया वॉर्ड होवे द्वारा साजरा केला गेला होता. होवे यांनी १८७० मध्ये आपल्या "मदर डे प्रोक्लामेशन" पुस्तकात अमेरिकन सिविल वॉर (युद्ध) मध्ये झालेल्या हिंसे संबंधी शांतिवादी प्रतिक्रिया लिहिली होती. यह प्रोक्लामेशन होवेचा महिलावादी विश्वास होता ज्याच्या अनुसार महिला तथा मातांना राजकीय स्तरावर आपल्या समाजाला आकार देण्याचा संपूर्ण अधिकार मिळाला पाहिजे.
*वेगवेगळ्या देशात मदर्स डे साजरा करण्याची परंपरा*

*यूरोप आणि इंग्लंड -*
यूरोप आणि ब्रिटनमध्ये आईप्रति प्रेम व आदर व्यकत करण्याच्या अनेक परंपरा प्रचलित आहेत. त्याअंतर्गतच एका विशेष रविवारी मातृत्व आणि मातांना सन्मानित केले जाते. त्याला मदरिंग संडे म्हटले जाते. मदरिंग संडे फेस्टिवल लितुर्गिकल कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. या कॅथोलिक कॅलेंडरमध्ये एका रविवारी वर्जिन मेरी आणि 'मदर चर्च' ला सन्मानित केले जाते. परंपरेनुसार या दिवशी प्रतिकात्मक भेटवस्तू देण्याची तथा आईचे प्रत्येक काम कुटूंबातील अन्य व्यक्तींकडून करण्याच्या प्रथेचा उल्लेख मिळतो.
*चीन-*
चीनमध्ये मातृ दिवस खूपच लोकप्रिय आहे. या दिवशी भेटवस्तूंच्या रुपात गुलनारचे फूल अधिक प्रमाणात विकले जातात. १९९७ मध्ये चीनमध्ये हा दिवस पश्चिम चीनमधील ग्रामिण परिसरात राहणाऱ्या गरीब मातांना मदत करण्याच्या उद्देशाने निश्चित करण्यात आला होता.
*जपान -*
जापानमध्ये मातृ दिवस शोवा काळाच्या दरम्यान महारानी कोजुन (सम्राट अकिहितो यांची आई) च्या जन्मदिनाच्या रुपात साजरा केला जातो. परंतु आता हा दिवस लोक आपल्या आईसाठी साजरा करतात. या दिवशी आईला गुलनार आणि गुलाबाची फुले भेट म्हणून दिली जातात.
*फ्रान्स-इस्त्रायलमध्ये -*
१९१८ मध्ये फ्रान्सच्या लियोन शहरात पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मातांच्या सन्मानार्थ हा दिवस आयोजित करण्यात आला होता. १९२९ मध्ये जपान सरकारने याला मान्यता दिली. इटलीमध्ये १२ मे १९५७ मध्ये पहिल्यांदाच मदर्स डे साजरा केला तर इस्त्रायलमध्ये २१ मार्च रोजी मातृदिन साजरा केला जातो.
*ग्रीसमध्ये*
सुरू झाला आईची पूजा करण्याचा रिवाज -
काही लोकांचा दावा आहे की, आईला सन्मान देणे किंवा आईची पूजा करण्याची परंपरा ग्रीसमधून सुरू झाली. असे म्हटले जाते की, स्य्बेले ही ग्रीक देवतांची आई होती. तिच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. येथे हा दिवस एखाद्या उत्सावाप्रमाणे साजरा केला जातो. आशिया मायनरच्या आसपास तसेच रोम देशात वसंत ऋतूत इदेस ऑफ मार्च १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत साजरा केला जातो. हा उत्सव प्रत्येक आईसाठी खास असा असतो.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संक्रांतीची माहिती-२०१९